मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ahmednagar reel news : 'रील'साठी जीवाशी खेळ! अहमदनगरमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट

Ahmednagar reel news : फेमस होण्याच्या नादात गळफास लावून व्हिडीओ करण्याचा प्रयत्न

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ahmednagar reel news : 'रील'साठी जीवाशी खेळ! अहमदनगरमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट

Ahmednagar reel news : फेमस होण्याच्या नादात गळफास लावून व्हिडीओ करण्याचा प्रयत्न

अहमदनगर – सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणांनी जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडला आहे. प्रकाश बुडा (रा. नेपाल) या तरुणाने 'फेमस' होण्यासाठी गळफास लावतानाचा व्हिडीओ शूट करताना खरंच गळफास लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

सामाजिक कार्यकर्त्याच्या तत्परतेमुळे जीव वाचला, पण स्थिती चिंताजनक

प्रकाश सध्या जामखेडमधील एका हॉटेलमध्ये काम करतो. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या उद्देशाने त्याने फाशी घेण्याचे नाटक सुरू केले. मात्र, प्रत्यक्षात गळ्याभोवती अडकलेली दोरी घट्ट झाली आणि काही क्षणातच तो बेशुद्ध झाला. परिसरात गोंधळ उडाला आणि याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रसंगावधान राखत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रकाशची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना केवळ प्रकाशसाठीच नाही, तर अशा स्टंट करणाऱ्या सर्व तरुणांसाठी धोक्याचा इशारा आहे. कोठारी यांनीही समाजाला आवाहन केलं आहे की, फक्त काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळू नका. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन असे जीवघेणे प्रकार टाळणं गरजेचं आहे.

शेअर करा