मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ahmednagar News : ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांनी घेतला मोठा निर्णय! 'मशाल' बाजूला ठेवून 'क्रांतिकारी शेतकरी पक्षा'तून लढणार नेवासा नगरपंचायत

•स्थानिक निवडणुकीसाठी स्वगृही परत; गडाख समर्थकांचा विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळवण्याचा निर्धार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ahmednagar News : ठाकरे गटाच्या शंकरराव गडाखांनी घेतला मोठा निर्णय! 'मशाल' बाजूला ठेवून 'क्रांतिकारी शेतकरी पक्षा'तून लढणार नेवासा नगरपंचायत

•स्थानिक निवडणुकीसाठी स्वगृही परत; गडाख समर्थकांचा विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळवण्याचा निर्धार

अहमदनगर :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आगामी नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह 'मशाल' बाजूला ठेवून, स्थानिक निवडणुकीत 'क्रांतिकारी शेतकरी पक्षा' च्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी मंत्र्यांचा जुना फॉर्म्युला

शंकरराव गडाख यांनी यापूर्वी, 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. आता त्यांनी पुन्हा याच 'जुना फॉर्म्युला' वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून (एकत्रित) बाहेर पडल्यानंतर अपक्ष म्हणून विधानसभेत विजयी झालेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता आणि मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते पक्षाच्या चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

कार्यकर्त्यांची बैठक:
नेवासे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीला मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुंवर, ॲड. अण्णासाहेब आंबाडे, अण्णासाहेब पठारे आदी उपस्थित होते.

गडाखांचे स्पष्टीकरण:
यावेळी बोलताना माजी मंत्री गडाख यांनी निवडणूक लढवण्याचा उद्देश स्पष्ट केला:

"आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येईल. ही लढाई कोणती व्यक्ती वा पक्षविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे."

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि शिस्तबद्ध काम करून नगराध्यक्षासह नगरसेवक पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. नव्या जोमाने व विकासाच्या हेतूने क्रांतिकारी शेतकरी पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा