३५ गंभीर गुन्ह्यातील सराईत, साथीदार बारामतीजवळ जेरबंद
पुणे, ९ एप्रिल, महाराष्ट्र मिरर: पुणे ग्रामीण पोलिसांनी ३५ गंभीर गुन्ह्यांत सहभाग असलेल्या एका सराईत गुन्हेगारला आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आले आहे.
5 मिनिट वाचन

तीन खुनांत दोघांचा सहभाग उघड, मयतांत प्रेमिका व तिच्या मुलाचा समावेश
पुणे, ९ एप्रिल, महाराष्ट्र मिरर:
पुणे ग्रामीण पोलिसांनी ३५ गंभीर गुन्ह्यांत सहभाग असलेल्या एका सराईत गुन्हेगारला आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आले आहे. तपासात दोघांनी मिळून तीन खून केल्याचे उघड झाले आहे. दोघांनाही अटक झाली आहे. त्यांच्या आणखी एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

अटक केलेल्या गुन्हेगारांची नांवे ललित दिपक खोल्लम (रा. शिरोली ता. खेड जि. पुणे) आणि नंदलाल होले (रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे) अशी आहेत. मयतांची नांवे धनंजय मारूती घेवडे (वय ३३ वर्षे, रा. रालेवाडी, ता. खेड जि.पुणे मुळ रा. कारेगाव ता. आंबेगाव, जि. पुणे), रूपाली विलास वाडेकर (रा. शिरोली ता. खेड जि पुणे) आणि श्रीकांत विलास वाडेकर (वय २६ वर्षे मुळ रा. शिरोली ता. खेड जि पुणे) अशी आहेत.
खेड पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. १८/०३/२०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात जेदवाडी ता. खेड जि. पुणे येथे मोकळया जमीनीत धनंजय मारूती घेवडेयाचा मृतदेह आढळून आला होता. मयताच्या डोक्यावर व तोंडावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते.
मयताचा भाऊ सचिन मारूती घेवडे (वय ३६ वर्षे, रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी फिर्याद नोंदविली होती.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला होता. घटनास्थळ हे दुर्गम भागात असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता. घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार ललित दिपक खोल्लम (रा. शिरोली ता. खेड जि. पुणे) व त्याचा एक साथीदार असे घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आढळून आले.
फुटेजमधील दुसऱ्या संशयिताची माहिती प्राप्त केली असता त्याचे नाव नंदलाल होले (रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे) असे निष्पन्न होवून तो देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. ललित खोल्लम व नंदलाल होले हे सराईत गुन्हेगार असून ते खून झालेल्या घटनास्थळाच्या परिसरात आढळून आल्याने त्यांच्यावर संशय बळावला. पथकाने दोन्ही संशयितांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खेड ते वडगाव निंबाळकर असे सुमारे १४५ किमी पर्यंत सलग सहा दिवस सुमारे ११० कॅमेऱ्यांचा मागोवा घेतला. दोन्ही संशयित गुन्हेगार हे वडगाव निबाळकर परिसरातच असल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली, २५ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक, खेड पो. स्टे. पथक व वडगाव निंबाळकर पो. स्टे. स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या मदतीने वडगाव निंबाळकर परिसरात योग्य पद्धतीने सापळा लावण्यात आला. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले.
संशयितांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, संशयितांनी खुनाच्या गुन्हयांची मालिकाच सांगितली. होले व मयत घेवडे असे एकाच गावाचे रहिवाशीआहेत. धनंजय घेवडे व नंदलाल होले यांचे भांडण झाले होते, तसेच त्याच गावातील निलेश कैलास सणस याचेसोबत देखील धनंजय घेवडे याचा वाद होता, त्या वादांचे कारणावरून ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी मिळून संगणमताने धनंजय घेवडे याचा खून केला असल्याचे कबुल केले आहे. संशयित निलेश कैलास सणस (वय ३४ वर्षे, रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे) याने इतर संशयितांना आर्थिक मदत केल्याची असल्याची माहिती तपासात समोर आल्याने त्यास देखील गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले. तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ललित खोल्लम याच्या विरोधात यापुर्वी २ खून, खुनाचा प्रयत्न १, दरोडा प्रयत्न २, जबरी चोरी १०, घरफोडी व चोरीचे २० असे एकूण ३५ गुन्हे सातारा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, यांच्या हद्दीत दाखल आहेत. त्याचप्रमाणे त्याने जबरी चोरी करताना अवैध गावठी पिस्तुलाचा वापर केलेला आहे. नंदलाल होले याच्यावर देखील दरोडयाचा गुन्हा दाखल आहे. दोघांवरही यापुर्वी मोक्का कायदयांतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या जामीनावर आहेत.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याने त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, आरोपी ललित खोल्लम याचे महिला रूपाली विलास वाडेकर (रा. शिरोली ता. खेड जि पुणे) हिचे सोबत प्रेमसंबंध होते, त्यातून ती नेहमी त्याचेकडे पैसे मागत होती, पैसे मागण्याचे कारणावरून त्यांचेत नेहमी भांडण होत होते, त्यादरम्यान तिचा मुलगा श्रीकांत वाडेकर हा देखील आरोपी ललित खोल्लम याचेकडे पेशाची मागणी करत होता. त्या गोष्टीचा राग आरोपी ललित खोल्लम याचे डोक्यात होता, रुपाली वाडेकर व श्रीकांत वाडेकर हे ठाणे येथे असताना दि.०७/११/२०२५ रोजी पैसे देतो अशी फूस लावून त्याने (मयत) श्रीकांत विलास वाडेकर (वय २६ वर्षे मुळ रा. शिरोली ता. खेड जि पुणे) यास खेड येथे बोलावून घेवून त्याचे अपहरण केले आणि त्याचा खून केला आणि होले याच्या मदतीने मृतदेह मंचर परिसरात नेवून जाळून टाकला. वाडेकर याचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे कबुल केले असून त्याबाबतचा महात्मा फुले चौक, ठाणे शहर बी.एन.एस. १४० (२) प्रमाणे दाखल असून गुन्हयास बी.एन.एस. १०३ हे कलम वाढ झालेली आहे.
श्रीकांत वाडेकर याची आई रूपाली वाडेकर ही आरोपी ललित खोल्लम यास माझा मुलगा श्रीकांत कोठे आहे? असे वारंवार विचारत होती, आरोपी ललित खोल्लम सोबत भांडण करत होती, त्यामुळे आरोपी ललित खोल्लम याने तिला ठाणे येथून शिरोली येथे बोलावून घेतले आणि दि. १३/११/२०२५ रोजी तिचे शिरोली येथील फ्लॅटवर जावून (मयत) रुपाली विलास वाडेकर (वय ४६ वर्षे रा. शिरोली ता. खेड जि. पुणे) हिचा देखील खून केला असल्याचे सांगितले असून खेड पो स्टे बी.एन.एस.१०३ (१) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
खोल्लम व होले यांनी रुपाली वाडेकर हिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना खेड पो स्टे बी.एन.एस.१०३ (१) या गुन्हयात वर्ग करून घेवून अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित केले असता १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
खोल्लम याने फरार कालावधीत मध्यप्रदेश येथून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे आणून विक्री केली होती, त्या अनुषंगाने कारवाई करून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेड पो स्टे चे पो.नि. सुभाष चव्हाण, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, सपोनि कुलदीप संकपाळ, वडगाव निंबाळकर पो.स्टे.चे सपोनि नागनाथ पाटील, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे, मंगेश बिगळे, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहूल पवार, रणजित कोंडके, खेड पो स्टे कडील पोसई श्रीकांत गोडगे, पोसई महेश गरड, श्रेणी पोसई शंकर भवारी, अंमलदार जिजाबापू बिडकर, सुदर्शन माताडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषीकेश गोपतवाड, म.पो.कॉ. वैशाली कांबळे, वडगाव निंबाळकर पो स्टे चे अंमलदार पोपट नाळे, हृदयनाथ देवकर यांनी केली असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे.
35 innkeepers, accomplices in serious crimes arrested near Baramati




