मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?आदित्यचा राज ठाकरेंना ‘महाराष्ट्रासाठी’ हृदयस्पर्शी संदेश!

Aaditya Thackeray On Raj Thackeray: “ भांडणं विसरू, मराठी अस्मिता वाचवू – चला एकत्र येऊ!”

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray On Raj Thackeray

Aaditya Thackeray On Raj Thackeray: “भांडणं विसरू, मराठी अस्मिता वाचवू – चला एकत्र येऊ!”

मुंबई :- राजकीय वैर, जुनी कटुता आणि दोन दशकांचा दुरावा… पण आता वाटतेय सगळं मागे टाकण्याची वेळ आलीय! शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत मनसेला साद घातली आहे. "महाराष्ट्रविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र यायला हवं!"

आदित्य ठाकरे म्हणाले, "राज ठाकरेंनी या विषयावर बोललं, आणि आम्ही लगेच उत्तर दिलं. आता त्यांच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा. आम्ही आजही तिथेच आहोत जिथे पूर्वी होतो – महाराष्ट्र, देश आणि समाजाच्या भल्यासाठी सज्ज!"

ही फक्त एक राजकीय प्रतिक्रिया नव्हे, तर भविष्यातील महत्त्वाच्या समीकरणांची नांदी असू शकते. कारण ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सुलहाची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच सूचकपणे म्हटलं होतं."छोट्या वादांना विसरून आपण मोठ्या हितासाठी एकत्र येऊ शकतो. मात्र त्यांनी एक अट ठेवली "राज ठाकरेंचा भाजप किंवा शिंदे गटाशी संबंध नसावा."

त्याला उत्तर देताना राज ठाकरेही म्हणाले होते "मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं अवघड नाही."

हेही वाचा: Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, वाहतूक विस्कळीत

शेअर करा