मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मार्केटयार्ड परिसरात तरुणाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या

किरकोळ वादातुन खून: एकास अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

मार्केटयार्ड परिसरात तरुणाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या

किरकोळ वादातुन खून: एकास अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे: मार्केटयार्ड परिसरातील बिबवेवाडी-कोंढवा रोडवर सोमवारी (ता. २०) पहाटे किरकोळ वादातून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या २५ वर्षीय बहिणीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कौशल कमलेश लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ आणि आरोपी यांच्यात सोमवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील अश्विनी पॅराडाईज सोसायटी आणि हॉटेल ओम प्युअर व्हेजसमोर काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी रोहनला रस्त्यात गाठले. संतापलेल्या आरोपींनी बॅटम पट्टीने (लोखंडी पट्टी) रोहनच्या शरीरावर वार केले आणि त्यानंतर रस्त्यावरील जड पेव्हर ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात घातला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे रोहनचा मृत्यू झाला.

भरवस्तीत आणि सार्वजनिक रस्त्यावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केटयार्ड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी कौशल लांडगे आणि त्याच्या साथीदारांना अवघ्या काही तासांत निष्पन्न करून बेड्या ठोकल्या.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की यामागे काही जुने वैमनस्य आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

A young man was murdered by hitting his head with a paver block in the market yard area of ​​Siddheshwar Temple in Rajgurunagar.

शेअर करा