मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भोसरीतील तरुणाची पावणेदोन लाखांची फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवली

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

भोसरीतील तरुणाची पावणेदोन लाखांची फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवली

पिंपरी: बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला लिंक पाठवून त्याच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ९० हजार ४६६ रुपये लंपास केले आहेत. ही घटना २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.

याप्रकरणी मोबाइल नंबर ८२४०३०९९२४ वरील एका अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास आरोपी महिलेने फिर्यादीला फोन करून आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन संपत असल्याचे सांगून तिने व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवली. ती लिंक उघडताच फिर्यादीच्या आरबीएल बँक क्रेडिट कार्डमधून एक लाख ९० हजार ४६६ रुपये डेबिट झाले. पोलीस उपनिरीक्षक मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा