मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जुना भांडणातून टोळक्याने केले तरुणाचे अपहरण

तरुणाची सुखरूप सुटका, सहा जणांना अटक

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

जुना भांडणातून टोळक्याने केले तरुणाचे अपहरण

तरुणाची सुखरूप सुटका, सहा जणांना अटक

पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीतून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेट समोर घडली.

ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (२६, कोरेगाव बुद्रुक) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नांव आहे. याबाबत समर्थ उर्फ सोन्या माणिक तावरे (१८, खालुंब्रे, खेड) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर बाळू जावळे (३४, कुरकुंडी), नितीन संजय थिटे (२७, रेटवडी, खेड), सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे (२८, वरची भांबरवाडी, खेड), अजय भरत गोपाळे (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), कुणाल प्रशांत चव्हाण (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), ओमकार दशरथ कोरडे (२४, सांडभोरवाडी, खेड) आणि एका विधीसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लाल रंगाची थार आणि पांढऱ्या रंगाची नेक्सॉन कारमधून एकत्र येत ऋषिकेश कल्हाटकर याला गाठले. जुन्या भांडणाच्या रागातून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने थार गाडीत घालून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण केलेला तरुण सुखरूप असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

A gang kidnapped a young man over an old dispute.

शेअर करा