मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धारVijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!

Pune Crime : पुण्यात व्यावसायिकाच्या फर्ममधून ४६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Pune Crime : लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुण्यात व्यावसायिकाच्या फर्ममधून ४६ लाखांची ऑनलाइन फसवणूक
लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : मोबाईलमधील व्हॉट्सॲप हॅक करून मार्केटयार्ड येथील एका व्यावसायिकाच्या फर्मच्या बँक खात्यातून तब्बल ४६ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. २६ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन माध्यमातून ही आर्थिक फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकाचे धारक आणि वापरकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या फर्ममध्ये कामकाज करीत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप हॅक केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या फर्मच्या बँक खात्यातून ४६ लाख रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले करीत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper