मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
गोकुळच्या सत्ता संघर्षावर ३ डिसेंबरला पुन्हा सुनावणी‘नको घड्याळ, नको तुतारी’; राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यास रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका?धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यातवारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगतकॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकीपूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकी

Mira Bhayandar Crime News : मुंबईतील नामवंत डिस्को क्लब व ऑर्केस्ट्रा बारमधील तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिला एजंटला बेड्या; मीरा-भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई, दोन तरुणींची सुटका

• काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाउंटन हॉटेलजवळ सापळा रचून छापा; बोगस ग्राहकाच्या मदतीने कारवाई

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Mira Bhayandar Crime News

मीरा-भाईंदर / वसई-विरार :- मुंबईतील नामवंत डिस्को क्लब आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिला एजंटला मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. Mira Bhayandar Crime News काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी या महिला एजंटच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका (रेस्क्यू) केली आहे.

कसा रचला सापळा? फाउंटन हॉटेल परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या ‘महिला अत्याचार प्रतिबंधक व विशेष बालकांचे संरक्षण आणि काळजी कक्ष’ यांना एका स्वयंसेवी संस्थेकडून (NGO) गोपनीय माहिती मिळाली होती. मीरा रोड पूर्व येथील काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाउंटन हॉटेल आणि काठियावाडी ढाबा परिसरात एक महिला एजंट ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली होती.

या माहितीची खातरजमा करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख आणि त्यांच्या पथकाने संबंधित परिसरात बोगस ग्राहक आणि पंच पाठवून सापळा रचला. Mira Bhayandar Crime News ठरल्याप्रमाणे महिला एजंट तरुणींना घेऊन त्या ठिकाणी येताच गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून महिला एजंटला ताब्यात घेतले आणि दोन पीडित तरुणींची या दलदलीतून सुटका केली.

पोलिसांचा सखोल तपास सुरू; या चार प्रमुख मुद्द्यांवर चौकशी

अटक करण्यात आलेली महिला एजंट मुंबईतील नामांकित डिस्को क्लब आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल तपास सुरू केला आहे.

अटक महिला एजंटने आतापर्यंत किती ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवल्या आहेत?

या रॅकेटमध्ये तिच्यासोबत आणखी कोणते साथीदार किंवा एजंट सहभागी आहेत?

सुटका केलेल्या दोन तरुणींव्यतिरिक्त तिने आणखी किती तरुणींना या व्यवसायात ढकलले आहे?

रेस्क्यू करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी मुंबईतील नेमक्या कोणत्या डिस्को क्लब आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये कामाला जात होत्या?

अटक महिला एजंटविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, दोन्ही पीडित तरुणींना सुरक्षितपणे महिला सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख, सहायक फौजदार राजाराम आसवाले, सहायक फौजदार किशोर पाटील, महिला सहायक उपनिरीक्षक भारती देशमुख, महिला सहायक उपनिरीक्षक निशा मांजरेकर, महिला पोलीस शिपाई सुरेखा वायळ, एमएसएफ सतीश सोनावणे व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा