मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
भाजपकडून संघटन विस्ताराची रणनीती; ‘सेवादूत अभियाना’च्या प्रभावी अंमलबजावणीवर भररोहित पवारांना बावनकुळेंचा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवरून राजकीय वातावरण तापलेप्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कारपालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेशडीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक

निवडणूक आयोगातील अधिकारीच विरोधकांना माहिती पुरवत आहेत; राहुल गांधींचा दावा

आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी व्यवस्थेतील घडामोडींना कंटाळले; निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नसल्याचेही स्पष्ट

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

राहुल गांधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर दावा केला आहे. निवडणूक आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सध्याच्या व्यवस्थेतील घडामोडींना कंटाळले असून, आयोगाच्या अंतर्गत कामकाजाची महत्त्वपूर्ण माहिती विरोधकांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिकागो येथील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातूनच अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळत असल्याचा दावा केला. आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सध्याच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ आहेत. 'आम्हाला यापुढे या गोष्टी पुढे नेता येणार नाहीत,' अशा भावना हे अधिकारी व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधकांना आता अधिक मोकळेपणाने आपली भूमिका मांडता येत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ऑक्टोबर महिन्यात पत्रकारांशी संवाद साधताना ज्ञानेश कुमार यांच्याकडून आपल्याला संदेश मिळत असल्याचे विधान त्यांनी केले होते. तसेच संपूर्ण प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्तांनी साक्षीदार म्हणून पुढे यावे, अशी मागणी केली होती. त्यांनी राजीनामा देऊन पदावरून बाजूला व्हावे, असे सूचक विधानही राहुल गांधी यांनी केले होते.

निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नाही

निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटींवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी विरोधकांच्या पुढील रणनीतीबाबतही भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षांनी निवडणुका लढवणे बंद केले, तर भारतीय लोकशाहीवरील जनतेचा विश्वासच संपुष्टात येईल, असे ते म्हणाले. त्यामुळे निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी निवडणूक व्यवस्थेतील त्रुटी जनतेसमोर आणणे आणि प्रत्येक निवडणुकीत ताकदीने लढा देणे, हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर