Skip to content

कॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकी

तळेगाव दाभाडे पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

कॅरीबॅग मागितल्याच्या कारणाने वृद्धाच्या अंगावर घातली चारचाकी
तळेगाव दाभाडे पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : किराणा दुकानात कॅरीबॅग मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून नशेत असलेल्या तरुणाने वृद्धाच्या अंगावर चारचाकी गाडी घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

या प्रकरणात संभाजी तात्याबा राऊत (६०, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बिराजदार (तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किराणा आणि दूध घेऊन कॅरीबॅग मागण्यासाठी थांबले असताना दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने बाहेर येऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सामान घेऊन जात असताना आरोपीने समोरून पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी अंगावर घालून उजव्या पायाला गंभीर दुखापत केली. जमिनीवरील दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचा मुलगा रामलिंग याने आडवे येत तो अडवला, ज्यात त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी गाडी घेऊन पळून गेला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper