Hinjewadi Civic Issues: हिंजवडीच्या विप्रो सर्कलजवळ समस्यांचा डोंगर; प्रशासनाचे दुर्लक्ष

Hinjewadi civic issues : हिंजवडीत नागरी सुविधांचा बोजवारा; विप्रो सर्कलजवळ कचरा आणि वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त
पुणे, महाराष्ट्र मिरर
Hinjewadi civic issues: महाराष्ट्राचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसराची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. एकीकडे कोटींचे कर गोळा केले जातात, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांसाठी आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना अक्षरशः लढा द्यावा लागत आहे. विशेषतः विप्रो सर्कल परिसराची बिकट अवस्था झाली असून, येथे रस्त्यावर साचलेला कचरा, अधिकृत बसथांब्याचा अभाव, अनियंत्रित वाहतूक आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे नागरिकांच्या जीवाला घोर लागला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन या गंभीर समस्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (hinjewadi Civic Issues traffic garbage issues)
विप्रो सर्कलची दयनीय अवस्था
आयटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विप्रो सर्कलच्या येथे एकही बसथांबा उपलब्ध नाही. अनेकवेळा तक्रार करुनही येथे बस थांब्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शेकडो आयटी कर्मचाऱ्यांना तासनतास थेट रस्त्यावरच जीव धोक्यात टाकून उभे राहावे लागते. त्यातच महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सगळा कचरा थेट रस्त्यावरच टाकला जात असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बस वेळेवर येत नाहीत आणि आल्या तरी थांबण्यासाठी जागा नाही, अशा दुहेरीत कात्रीत कर्मचारी सापडल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. Hinjewadi Civic Issues

परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नागरिक, आयटी कर्मचारी तसेच, विविध कम्युनिटी सदस्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही….
रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
विप्रो सर्कल परिसर आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग साचल्यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हजारो आयटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली असून, डासांचा व जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना व कर्मचाऱ्यांना नाक दाबून चालण्याची वेळ आली आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे विप्रो सर्कल परिसर एक प्रकारे कचराकुंडी बनला असून, महापालिका व संबंधित प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. Hinjewadi Civic Issues

“बस वेळेवर येत नाहीत, ६५ रुपयांचे तिकीट तरीही सुविधा नाही”
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सांगत एका संतप्त प्रवाशाने सांगितले की, “दोन-दोन तास बस वेळेवर येत नाहीत. पीएमपीएमएल असो किंवा अन्य बस, ६० ते ६५ रुपये भरूनही प्रवाशांना साध्या बसमध्ये मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. गर्दीमुळे बसेसमध्ये चढणेही कठीण होते.”
Crime News तेवीस वर्षानंतर हत्येचा उगवला सूड; चौघे अटकेत

एकीकडे लाखो रुपयांचा प्राप्तिकर आणि महापालिकेचे स्थानिक कर भरूनही जर नागरिकांना नरकयातना भोगव्या लागत असतील, तर हिंजवडीच्या विकासाचा पोकळ दावा करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)



