पुणे

Pune News : पितृपंधरवड्यामुळे श्राध्दासाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणी; भाव वाढले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणपतीनंतर पितृपंधरवडा सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळभाज्यांना मागणी वाढली आहे. विशेषतः श्राध्दासाठी वापरल्या जाणाऱ्या गवार, भेंडी, चवळई शेंगा, कारली, काकडी आणि घोसावळे या भाज्यांची खरेदी वाढल्याने त्यांच्या भावात १० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तसेच उपनगरांमधील किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून या भाज्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजाराबरोबरच किरकोळ बाजारातही या भाज्यांचे दर तेजीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

किरकोळ बाजारात सध्या या भाज्यांची ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांना तुलनेने कमी भाव मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

मार्केट यार्डातील बाजारात फळभाज्यांच्या ७० ते ८० गाड्यांची आवक झाली. जिल्ह्यासह पुणे विभागातील विविध भागांतून ही आवक होत आहे. आवक चांगली असली तरी पितृपंधरवड्यामुळे काही निवडक भाज्यांना मागणी वाढल्याने त्यांच्या दरात तेजी आली आहे.


फुल बाजारात मंदी
मार्केट यार्डातील फुल बाजारात मागील दोन महिन्यांपासून फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवातील सुरुवातीचे पाच दिवस वगळता बाजारात मंदीचे वातावरण आहे. श्रावणात मागणी अधिक असतानाही आवक वाढल्याने फुलांचे दर घसरले. शेतकऱ्यांनी श्रावणासाठी माल राखून ठेवल्याने आवक वाढली होती. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला मागणी वाढल्याने दरात तेजी आली; मात्र त्यानंतर मागणी घटल्याने दर पुन्हा कमी झाले. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने आवक आणि मागणी दोन्ही कमी आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button