CRIME NEWS : थेरगावात जुगारप्रकरणी महिलेवर गुन्हा

जुगार अड्ड्यावरून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
पिंपरी CRIME NEWS: थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या समोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या एका महिलेवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार यांनी याबाबत फिर्याद दिली असून, सखुबाई दशरथ शिंदे (वय ३२, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.CRIME NEWS
वरील महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्यासमोर ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळत आणि खेळवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (८ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणा छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह एकूण एक हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.CRIME NEWS
वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
CRIME NEWS



