क्राईम न्यूजमहाराष्ट्र

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; कर्ज मिळवण्यासाठी मागितली होती व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यांनी लाच, स्वीकारताना रंगेहात अटक

Maharashtra Anti Corruption Bureau Arrested Government Servant while taking Bribe : महात्मा फुले मागासवर्ग विभाग महामंडळ कार्यालय हिंगोली, व्यवस्थापक, लिपिक, कार्यालयीन सहाय्यक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जालना :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau Chatrapati Shambhaji Maharaj News छत्रपती संभाजी नगरच्या विभागाकडून मार्गदर्शन करत जालना लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या कार्यालयात भ्रष्ट अधिकारी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले आहे.सुनिल लक्ष्मण काची (50 वर्षे) पद- जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, छाया अशोक वाकोडे (54 वर्षे) , पद- कार्यालय सहाय्यक,आशिष उत्तम जाधव (24 वर्षे), पद- लिपीक बाहयसेवा, या तीन लाचखोर अधिकारी कर्मचारी यांना अटक केली आहे. Anti Corruption Bureau Maharashtra News

तक्रारदार यांनी सिंधुकृपा फुड्स या नावाने मसाला उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास निगम योजना (NSKFDC) अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ येथे ऑनलाईन अर्ज दिला होता. तक्रारदार यांचे कर्ज प्रकरण मंजुरीला पाठवण्यासाठी वाकोडे यांनी 28 मार्च रोजी पंचासमक्ष 1,500 रूपये लाचेची मागणी करून काची यांना भेटण्यास सांगितले वरुन तक्रारदार 1 एप्रिल रोजी काची यांना भेटले असता त्यांनी कर्ज प्रकरण मंजुरीला पाठविण्यासाठी वाकोडे यांना 500 रु. देवुन टाक, असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले. Anti Corruption Bureau Maharashtra News

काल 2 एप्रिल रोजी वाकोडे यांनी पंचासमक्ष 1 हजार 500 रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम आलोसे आशिष जाधव यांचेकडे देण्यास सांगितले. त्यावरुन जाधव यांना वाकोडे यांचे सांगणेवरुन तक्रारदार यांचेकडून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालयाचे आवारात पंचासमक्ष 1 हजार 500 रु लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. सुनील काची, छाया वाकोडे व आशिष जाधव यांना ताब्यात घेतले असुन त्यांचेवर पोलीस ठाणे कदीम जालना, जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Anti Corruption Bureau Maharashtra News

मार्गदर्शक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर,किरण बिडवे
पोलीस उपअधीक्षक, ए.सी.बी. जालना,पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, संदीपान लहाने.
ए.सी.बी. जालना युनिट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0