Uncategorized

Pune Crime News : खडक पोलीस ठाण्याची कामगिरी ; रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

Pune Khadak Police Arrested Robbery Gang : रात्रीच्या वेळी टोळक्यांकडून होत होती लुट पोलिसांनी केली कारवाई, आरोपींकडून बाईक आणि सोने जप्त

पुणे :- रात्रीच्या वेळी दुचाकी वरून जाणारे इसमास लुटणाऱ्या चोरणा-या Robbery Gang टोळीचा त्यांचा माग काढून अटक करण्यात व त्यांचेकडुन चोरीची सोन्याची चेन दोन दुचाकी जप्त करण्यात खडक पोलीस स्टेशनच्या Pune Khadak Police तपास पथकास यश आले आहे.सदरबाबत अधिक माहीती अशी की, फिर्यादी हे 29 मार्च रोजी रात्रौ 11.30 सुमारास बोबींल मार्केट, शुक्रवार पेठ, पुणे समोरील हरिभाऊ भंडारी या सार्वजनिक रोडवरती आरोपी क्र.01 वय अंदाजे 24 वर्ष वयाचा, अंगाने सडपांतळ असणारा, काळया रंगाची पॅन्ट व काळया रंगाचा शर्ट घातलेला अनोळखी इसम व आरोपी क्र.2 वय अंदाजे 25 वर्ष, अंगाने सडपांतळ काळ्या रंगाची पॅन्ट व पांढ-या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने जबरदस्तीने फिर्यादी यांची दुचाकी अडवुन शिवीगाळ करुन आरोपी क्र.03 अदाजे 25 वर्ष वयाचा, अंगाने मजबूत व पांढ-या रंगाचा शर्ट घतलेला अनोळखी इसम व आरोपी क्र.०४ अभिषेक दशरथ वाघमारे ऊर्फ मम्या 22 वर्ष,पुणे यांनी सर्वानी संगनमत करुन शिवीगाळ व हाताने मारहाण करुन, जबदरस्तीने व बळजचरीने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चेन चोरी करुन घेऊन गेल्याने फिर्यादी यांनी याबाबत खडक पोलीस स्टेशन ठाण्यात भादवि कलम 392,341,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. Pune Crime News

रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे दुचाकीवरून जाणा-या व्यक्त्तिस अडवून मारहाण व धमकावुन लुटण्याचा प्रकार घडल्याने त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक, रविंद्र गायकवाड यांनी तात्काळ दखल घेवुन संपतराव राउत, पोलीस निरिक्षक गुन्हे यांचेमार्फत तात्काळ दोन तपास पथके तयार करुन त्यांना तपासाबाबत योग्य सुचना दिल्या. वरिष्ठांनी तपास पथकास दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप- निरीक्षक प्रल्हाद डोंगळे व त्यांचे स्टाफमधील किरण ठवरे, हर्षल दुडम, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, हे गस्त करीत असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, जबरी चोरी करणारे इसम हे घोरपडे पेठ येथील मंत्रा हॉटेलच्या मागील बाजूस असणा-या मोकळ्या जागेत आले असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन जबरी चोरी करणार-या पैकी आरोपी अभिषेक दशरथ वाघमारे ऊर्फ मम्या (22 वर्ष) याला ताब्यात घेवून व त्याचेकडून मिळालेल्या माहितीचे आधारे इतर आरोपी नामे 1) मयुर किरण भोसले, (19 वर्षे) 2) सुदर्शन विजय व मोठे, (24 वर्षे) दांडेकर पुल पुणे यांना सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयातील अटक आरोपी यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेली 1) सोन्याची अंगठी अंदाजे 7 ग्रॅम वजनाची रूपये 43 हजार 283 तसेच गुन्हयात वापरलेली 2 दुचाकी अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास चालु आहे. अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण 1 लाख 33 हजार 283 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. Pune Crime News

पोलीस पथक

अमितेश कुमार पोलीस आयुक्त Pune CP Amitesh Kumar, प्रविण पवार पोलीस सह आयुक्त, प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे,संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 पुणे रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राउत पोलीस निरीक्षक (गुन्हे), नितीनकुमार नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रल्हाद डोंगळे पोलीस उप-निरीक्षक, अजीज बेग पोलीस उप-निरीक्षक पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाचळे, प्रशांत बडदे, लखन ढावरे, रफिक नदाफ, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, चंद्रशेखर खरात, प्रविण गावीत, सुहास साळुंके यांचे पथकाने केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0