क्राईम न्यूजमुंबई
Trending

Cyber Fraud : सायबर फसवणुकीला लगाम! शेअर ट्रेडिंगच्या नावाने 27 लाखांची फसवणूक करणारा अटकेत

Mumbai Cyber Crime Branch : मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; देशभरात 106 गुन्हे दाखल असलेल्या बँक खात्याचा वापर

मुंबई :- शेअर ट्रेडिंगमध्ये Mumbai Share Market Trading भरघोस नफ्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर आरोपींच्या टोळीतील एका सक्रिय हस्तकाला मुंबई उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. दहिसर येथील एका 58 वर्षीय महिलेची 27 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Latest Cyber Fraud News

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2025 रोजी दहिसर येथील एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवानी नावाच्या अनोळखी व्हॉट्सॲप धारकाने त्यांना शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाठवून ‘TBVIP168’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले. या ग्रुपमध्ये ट्रेडिंगच्या टिप्स आणि मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलेला m.tbstocktrade.com नावाचे एक बनावट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. आयपीओ (IPO) आणि ब्लॉक डील्सच्या नावाखाली आरोपींनी महिलेकडून विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 27 लाख 44 हजार 263 रुपये जमा करून घेतले. बनावट ॲपवर नफ्याची रक्कम दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला आणि अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. फिर्यादी महिलेने सुरुवातीला 4 लाख रुपये जमा केले होते, त्यापैकी 2 लाख 30 हजार रुपये आरोपींनी तात्काळ दुसऱ्या खात्यात वळते केले होते. या बँक खात्याचा शोध घेताना, ते आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करत पोलिसांनी ठाणे येथून आरोपी विनायक प्रमोदकुमार बरनवाल (वय 28, रा. कशेळी, ठाणे) याला अटक केली. आरोपीने स्वतःच्या नावाचे बँक खाते जाणूनबुजून या गुन्ह्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

आरोपीच्या बँक खात्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, देशभरातील विविध राज्यांमध्ये या खात्यावर एकूण 106 ऑनलाइन सायबर फसवणुकीच्या तक्रारी दाखल असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (सायबर) पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरतोडे, आणि प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार वसईकर,नाडगौडा,परब यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0