सिंहगडरोड पोलीसांची कामगिरी ; तरूणाकडे बंदूक आणि एक जीवंत काडतुस जप्त
Sinhgad Road Police Arrested Person With Gun : सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपीस एक बंदूक (अग्नीशस्त्र) व एक जीवंत काडतुसासह केले जेरबंद
पुणे :- (31 मार्च ) रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पो स्टे पुणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगड रोड पोलीस स्टेशन Pune Sinhgad Road Police पुणे शहर याचे आदेशाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत इसम चेक करीत असताना पोलीस अमंलदार अमोल पाटील यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “स्वामीनारायण मंदीराच्या बाजुच्या सर्व्हिस रोड न-हे पुणे येथे अंगामध्ये पिवळ्या रंगाचा फुलमाईचा टि शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम हातामध्ये पिस्टल Person With Pistol घेवुन उभा आहे.” Pune Crime News
अशी बातमी मिळाल्याने बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करता, बातमीतील वर्णनाचा एक इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व आमची नजरा नजर होताच तो सदरचा इसम त्या ठिकाणावरुन पोलीसांची नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करुन काही अंतरावर त्याला शिताफीने पकडून, त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव साईनाथ बंडु आडे (19 वर्षे) रा. शिवानी हॉटेलच्यावर, जे एस पी एम कॉलेज जवळ, पहीला मजला न-हे पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता, त्याचे पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक 45 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व पॅन्टचे खिश्यात 500 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकुण 45 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे, शहर हे करीत आहे. Pune Crime News
पोलीस पथक
अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर Pune CP Amitesh Kumar , प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम , पोलीस उप-आयुक्त परीमंडळ 3. पुणे शहर, भिमराव टिळे , सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, विजय कुंभार , वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली. Pune Crime News