
•शिवसेना उद्धव ठाकरे गट 21 जागा काँग्रेस 15 राष्ट्रवादी 9 आणि मित्र पक्ष तीन असा फॉर्मुला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागेचा फॉर्मुला ठरला असल्याचे चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सांगितले जात आहे. माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 जागा काँग्रेस पक्षाला 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 09 जागा आणि मित्र पक्षाला 03 अशा लोकसभेच्या जागेचा फॉर्म्युला ठरल्याचे चर्चा सध्या सुरू आहे. Maha Vikas Aghadi
पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात ही पहिलीच निवडणूक होणार असल्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते कोणाचे वर्चस्व कायम राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना म्हणाले की आम्ही एकत्र बसलो होतो. सर्व विषयांची चर्चा आम्ही केली आहे. राहुल गांधी हे 10 तारखेला महाराष्ट्रात येणार आहे आणि त्यांची सभा होणार आहे त्याबद्दल चर्चा झाली. आमची सर्व विचारांवर चर्चा झाली जे समविचारी आहे ते सोबत आहे. जागा वाटप ही जो निवडून येणार आहे त्याकडे जागा जाईल. वंचितसोबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही आकड्यात जात नाही आम्ही इलेक्टिवमेरिटवर काम करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. Maha Vikas Aghadi