Ajit Pawar : दारू दुकानांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाईन-बीअर शॉपींना सोसायटीची एनओसी अनिवार्य!

Ajit Pawar On Wine Shop NOC Certificate : एखाद्या सोसायटीत दारूचे दुकान असल्यास त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दारू दुकानांकडून नाहक त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.
मुंबई :– राज्यातील कोणत्याही गृहनिर्माण संस्थेच्या व्यावसायिक दुकानात नवीन दारू आणि बिअर शॉपी सुरू करण्यासाठी संबंधित सोसायटीची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) अनिवार्य असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी विधानसभेत केली.सोसायटीने एनओसी न दिल्यास त्या सोसायटीत दारू किंवा बिअर शॉप सुरू करता येणार नाही. Ajit Pawar On Wine Shop NOC Certificate तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही प्रभागातील लोकांना दारू किंवा बिअर शॉप बंद करायचे असल्यास 75% लोकांनी मतदान केल्यानंतर विरोध केला तर ते बंद करावे लागेल.
मंगळवारी विधानसभेत आमदार महेश लांडगे, राहुल कुल आदी आमदारांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बिनदिक्कतपणे बिअर शॉपी आणि दारूची दुकाने सुरू असल्याचे आमदारांनी सांगितले.त्यामुळे मद्यपींकडून त्रास, वाद, महिलांची छेडछाड अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. स्थानिक लोकही विनाकारण चिंतेत पडतात. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीअर आणि दारूची दुकाने सुरू करण्यासाठी नियमावलीत सुधारणा करण्याची मागणी केली.
आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार दारूविक्रीला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. सध्या राज्यात अनेक दशकांपासून दारू विक्रीचे नवीन परवाने दिले जात नाहीत.शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांजवळ दारूची दुकाने उघडण्यास परवानगी नाही. आता कोणत्याही भागातील स्थानिक जनतेला कोणतेही दारूचे दुकान बंद करायचे असल्यास मतदान प्रक्रियेअंतर्गत 75 टक्के मतदानाने दुकान बंद करणे बंधनकारक असेल.