Thane Sex Racket : वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलांवर गुन्हा दाखल

Thane Sex Racket : वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या महिला दलालांवर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडुन कारवाई,चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ठाणे :- गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (11 मार्च) रोजी ठाण्यामधील आर मॉल भागात सापळा रचत गरीब व गरजू महिला व तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका महिला दलालाला अटक केली. Thane Sex Racket छाप्यात पोलिसांनी दोन पीडितांची सुटका केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. Thane Latest Crime News
वेश्यागमनासाठी मुली पुरवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सिल्व्हरडोर ब्युटीक हॉटेल, आर मॉल समोर, घोडबंदर सर्विस रोड, मानपाडा ठाणे येथे सापळा रचून पोलिसांनी वेश्या दलाल महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्या ताब्यातील दोन पिडीत महिलांची तात्काळ सुटका करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने रेस्क्यु फाऊंडेशन पोईसर, कांदिवली पश्चिम येथे ठेवण्यात आले आहे.चितळसर पोलीस ठाणे Chitalsar Police Station येथे भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 143(1), 143(3) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन महिला दलाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.के. वालगुडे, पोलीस हवालदार आर. यु. सुवारे, के. बी. पाटील, व्ही. आर. पाटील, महिला पोलीस अंमलदार खरात, थोरात, चांदेकर, पोलीस अंमलदार घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.