क्रीडा

Rahul Dravid Accident : राहुल द्रविडसोबत अपघात, आयपीएल 2025 पूर्वी वाईट बातमी,

Rahul Dravid Accident : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड या अपघातात जखमी झाला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याचा फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत आहे. IPL 2025 पूर्वी ही वाईट बातमी आहे.

IPL 2025 :- आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी राहुल द्रविडकडे Rahul Dravid Accident सोपवण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच हा अनुभवी खेळाडू अपघाताचा बळी ठरला आहे. राहुल द्रविड जखमी झाला असून त्याचे पाय प्लास्टरमध्ये आहेत. राजस्थान रॉयल्सने द्रविडचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.राजस्थान रॉयल्सने सांगितले की, द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली.

राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर लिहिले – बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना दुखापत झालेला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वेगाने बरा होत आहे. बुधवारी तो जयपूरमध्ये संघात सामील होईल.

राहुल द्रविड जखमी झाला आहे.त्याच्या डाव्या पायावर पट्टीही आहे बांधली आहे परंतु असे असले तरी तो राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे. या हंगामासाठी द्रविडची राजस्थानने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.द्रविड गेल्या वर्षीपर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकला होता.

राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या मोसमात चांगला खेळला. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता पण अंतिम फेरी गाठू शकला नाही. यावेळी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ विजयी होईल, अशी आशा राजस्थानला असेल. राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये आयपीएल जिंकले, जे या स्पर्धेचे पहिले सत्र होते.

राजस्थानचा संघ
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महिश टीक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युधवीर सिंग,फजलहक फारुकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठौर, अशोक शर्मा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0