मुंबई

Pune Crime News : सराईत मोटार सायकल चोर संतोष शिवराम घारे यास अटक

Pune Police Arrested Bike Stole Ciminal : विश्रामबाग पोलिसांनी मोठी कारवाई ; चोरीच्या एकुण 25 मोटार सायकल जप्त

पुणे :- पोलीस आयुक्तालया अंतर्गत विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने वाहन चोरीच्या गुन्हयामध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली असल्याने अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रवीण पाटील, अपर पोलीस आयुक्त, संदीप सिंग गिल, पोलीस उपायुक्त परिमंडळ-01, वसंत कुंवर, सहाय्यक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांनी वाहन चोरीचे गुन्हे रोखण्याकरीता व दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकरीता करावयाच्या उपाययोजना बाबत दिपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. Pune Crime News

दिपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी झालेल्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल तपासले असता रेकॉर्ड वरील सराईत मोटार सायकल चोर संतोष शिवराम घारे (ओझरडे, मावळ जि. पुणे) हा मोटार सायकल चोरी करीत असल्याचे उघड झाले. Pune Crime News

मोटार सायकल चोर संतोष शिवराम घारे हा फिरस्ती असून तो पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात स्वतःचे वेगवेगळी नांवे सांगुन पोलीसांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याचे ठिकाणाबाबत माहीती मिळत नसल्याने तो मिळुन येत नव्हता. दिपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, संतोष मोरे, सहाय्यक पोलीस फौजदार राकेश गुजर, पोलीस हवालदार रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, पोलीस नाईक महावीर वलटे, पोलीस शिपाई आशिष खरात, अर्जुन थोरात, साताप्पा पाटील, नितीन बाबर,राहुल मोरे, संतोष शेरखाने यांचे पथक तयार करुन आरोपी संतोष शिवराम घारे याचा शोध सुरु केला. पथकातील पोलीस हवालदार मयुर भोसले आणि पोलीस शिपाई आशिष खरात यांनी आरोपी संतोष घारे याचा आळंदी, पुणे स्टेशन, देहु, चाकण, पिंपरी येथे सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीचा मागमुस काढत सतत 07 दिवस कसोशीने शोध घेवुन त्यास अतिशय शिताफीने पुणे स्टेशन येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा क्रमांक कलम 379 भा.दं.वि. प्रमाणे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने नमूद गुन्हयातील तसेच यापुर्वी वेळोवेळी विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतुन चोरी केलेल्या एकुण २५ मोटार सायकल काढून दिलेल्या आहेत.विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुनअतिशय शिताफीने आरोपी नामे संतोष शिवराम घारे वय 42 वर्षे रा. मुपो. ओझरडे, ता. मावळ जि. पुणेयास अटक केलेली असुन त्याच्याकडुन एकुण 25 मोटार सायकल जप्त केले आहे. Pune Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) , अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01 संदीप सिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसंत कुवर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे, सहाय्यक पोलीस फौजदार राकेश गुजर, पोलीस हवालदार रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, हेमंत पालांडे, पोलीस नाईक महावीर वलटे, पोलीस शिपाई आशिष खरात, अर्जुन थोरात, साताप्पा पाटील, नितीन बाबर, राहुल मोरे, संतोष शेरखाने, पोलीस शिपाई अर्जुन कुडाळकर यांनी केलेली आहे.

पुणे शहर पोलीसांकडुन नागरिकांना आवाहन करण्यात येते की

1) नागरिकांनी प्रत्येक वाहनास जीपीएस लावुन घ्यावे.

2) आपले वाहन पार्कीग करतेवेळी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पार्क करावे.

3) नागरिकांनी वाहन रस्त्यावर लावु नये. ठरवुन दिलेल्या पार्कीग मध्येच लावावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0