मुंबई

Eknath Khadse In BJP : शरद पवारांना बसणार धक्का! एकनाथ खडसे आज भाजपमध्ये परतणार आहेत

•एकनाथ खडसे यांनी भाजपमधून (Eknath Khadse In BJP) राजकारणाला सुरुवात केली मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. एकनाथ खडसे त्यांच्या जुन्या पक्षात परतणार आहेत. एकनाथ खडसेंनी स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे रविवारी (7 एप्रिल) म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांनी एकनाथ खडसे लवकरच भाजपवासी होणार असल्याच्या बातम्या सध्या फिरत असल्यामुळे खडसे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करत असल्याचे सातत्याने बातम्या माध्यमातून फिरत होत्या. भाजपा पासून दूर गेलेले एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि शरद पवार गटाकडून त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती. भाजपाकडून एकनाथ खडसे यांना सातत्याने दुजाभाव दिल्या बाबत त्यांनी भाजपाचे साथ सोडले होते. एकनाथ खडसे यांच्यावर भाजप सरकार असताना पदाचा गैरवापर करत एक जमीन विकल्याचा आरोप केल्या जात होता आणि त्यानंतर त्यांना आपले मंत्री पदही सोडावे लागले कालनदाराने भाजपाने त्यांच्याकडून जातात त्याने ध्वजाभाऊ केला असा आरोप करत त्यांनी भाजपला सोड सुट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पुन्हा ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने फिरत होत्या. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना भाजपाकडून यंदाच्या लोकसभे निवडणुकीकरिता उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपा मध्ये जाणार असल्याच्या बातम्या फिरू लागल्या आहेत. दोन दिवसात एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमातून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0