क्राईम न्यूजपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कासारसाई येथे भिंत पाडून ऑफिस कंटेनरची चोरी

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी: मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे एका खासगी प्लॉटमधील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी ऑफिस कंटेनर चोरून नेला. ही घटना १० ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये सकाळी साडेआठ वाजताच्‍या सुमारास कासारसाई येथे घडली.

याप्रकरणी डॉ. पंकज पोपटराव येवले (५३, अमृतवेल कॉलनी, रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद लाटे, मधुकर बावकर, एक क्रेन चालक आणि क्रेनवरील कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या प्लॉटमध्ये प्रवेश केला. तिथे असलेली कंपाउंडची भिंत पाडून अतिक्रमण करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर प्लॉटमध्ये असलेला १ लाख २५ हजार रुपयांचा लोखंडी ऑफिस कंटेनर क्रेनच्या साहाय्याने जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button