Mumbai News : ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांना चिन्ह कसे?; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर संजय राऊतांचा आशावाद, फडणवीसांवर घणाघात!
Mumbai News : धनुष्यबाण योग्य ठिकाणीच जाईल; आदिवासी अन् MPSC विद्यार्थ्यांची मुंबईत दडपशाही’ — संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्ला
Mumbai News :मुंबई :- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना विचारलेला रोखठोक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. “ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांच्यासाठी पक्ष चिन्हाचे महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रार केली त्यांच्यासाठी?” असा ऐतिहासिक सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आशादायक प्रतिक्रिया व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ योग्य ठिकाणीच जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.त्याचबरोबर, मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनावरून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘चोराला घटनात्मक संरक्षण का? पारदर्शक निकालाची आशा’
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “न्यायामूर्ती बागची यांची टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. फुटीरांना चिन्ह आणि पक्ष कसा दिला जाऊ शकतो? तक्रारदाराची बाजू ऐकण्याऐवजी घटनेशी द्रोह करणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांनाच घटनात्मक संरक्षण दिले जात आहे, यावर न्यायाधीशांनी बोट ठेवले आहे. सुनावणी अत्यंत योग्य दिशेने सुरू असून, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण मूळ शिवसेनेलाच मिळेल आणि सर्वोच्च न्यायालयाकडून पारदर्शक निकाल येईल.”
‘आदिवासींच्या घामाचा वास फडणवीसांना सहन होत नाही; विद्यार्थ्यांना मुंबईतून फरफटत बाहेर काढले’
नाशिकहून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरून राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले: आदिवासींची हेळसांड: नाशिकहून आलेले आदिवासी विद्यार्थी मुंबईत निवाऱ्यासाठी टिळक भवनात थांबले होते. जर सरकारला ते खटकत होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची व्यवस्था सह्याद्री गेस्ट हाऊस, आमदार निवास किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये करायला हवी होती.
दडपशाहीचा आरोप: “सरकारला आदिवासी बंधूंच्या घामाचा वास सहन होत नाही. काँग्रेसने टिळक भवनात त्यांची सोय केली, तर फडणवीसांनी पोलिसांना आदेश देऊन त्या विद्यार्थ्यांना फरफटत बाहेर काढले आणि थेट मुंबईच्या वेशीवर नेऊन सोडले,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
‘फडणवीसांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे; आंदोलनात फूट पाडणे बंद करा’
पुण्यातील MPSC विद्यार्थी आणि मुंबईतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत म्हणाले, “आदिवासी आणि MPSC विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र केला पाहिजे. जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतःला राज्याचे पालक मानत असतील, तर त्यांनी आंदोलकांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. आमदार रोहित पवार आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, तर करू द्या! विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याऐवजी 4-5 जण फोडून आंदोलनात फूट पाडणे याला राज्याचे नेतृत्व म्हणत नाहीत. फडणवीसांनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांचे ऐकून घेतले तर काय बिघडणार आहे?”



