Pune News : अनधिकृत फ्लेक्सप्रकरणी ‘न्याती’ला ३०.५० लाखांचा दंड
Pune News : महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली; येरवडा-वडगाव शेरी परिसरात पुन्हा बेकायदेशीर बोर्ड : पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची शिफारस
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात बेकायदेशीर फलक, फ्लेक्स आणि बॅनर्स लावून परिसर विद्रूप करणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत परवाना न घेता ठिकठिकाणी अनधिकृत जाहित फलक लावल्याप्रकरणी ‘न्याती इव्होक’ या गृहप्रकल्पाच्या जाहिरातदारावर महापालिकेने तब्बल ३० लाख ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित जाहिरातदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या या कठोर पावलांनंतरही न्याती गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा दंडाचा भरणा आलेला नाही, असे आकाशचिन्ह विभागाने स्पष्ट केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
वारंवार नियमांचे उल्लंघन
येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान ‘न्याती इव्होक’ नावाचे ६ चौ. फुटांचे ६१ जाहिरात फलक विनापरवाना लावल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यावर तत्काळ कारवाई करत महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने हे सर्व फलक हटवले होते. मात्र, महापालिकेने निष्कासन कारवाई केल्यानंतरही संबंधित जाहिरातदाराने सर्व परिसरात पुन्हा अनधिकृत बोर्ड लावल्याचे दिसून आले. पालिकेच्या नियमांना आणि आदेशांना सर्रास हरताळ फाळणाऱ्या या जाहिरातदाराच्या वर्तनाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
सातत्याने होणाऱ्या या उल्लंघनानंतर वरिष्ठ आकाशचिन्ह व परवाना निरीक्षक सोमनाथ गोरे आणि परवाना निरीक्षक अमोल पवार यांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी वडगाव शेरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अधिकृत पत्र पाठवले. महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक अधिनियम १९५५ चे कलम ३ आणि मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्र. १५५/२०११ मधील स्पष्ट आदेशानुसार संबंधित जाहिरातदारावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. पालिकेच्या या आक्रमक भूमिकेनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, जाहिरातदाराने ते सर्व फलक स्वतःहून काढून घेतल्याचे दिसून आले. परंतु, ७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या २५ दिवसांच्या कालावधीत ६१ अनधिकृत बोर्ड विनापरवाना लावल्यामुळे ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व जाहिरात नियंत्रण नियम २०२२ नुसार दंडात्मक नोटीस बजावण्यात आली असून, प्रति बोर्ड, प्रति दिवस २,००० रुपये या नियमानुसार २५ दिवसांचे एकूण तीस लाख पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
२५ दिवसांचा ३०.५० लाखांचा दंड
जरी जाहिरातदाराने नंतर फलक स्वतःहून काढून घेतले असले, तरी ७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या २५ दिवसांच्या कालावधीत ६१ अनधिकृत बोर्ड विनापरवाना लावलेले होते. यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व जाहिरात नियंत्रण नियम २०२२ नुसार महापालिकेने ७ सप्टेंबर २०२६ रोजी जाहिरातदाराला दंडात्मक नोटीस (जा.क्र. ३७५९) बजावली. प्रति बोर्ड, प्रति दिवस २,००० रुपये या नियमानुसार २५ दिवसांचे एकूण ३० लाख ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
थकबाकी राहिल्यास मालमत्ता करावर बोजा
पालिकेने बजावलेल्या नोटीसनुसार, ही दंडाची रक्कम नोटीस मिळताच ४ दिवसांच्या आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत दंडाचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि ही दंडात्मक रक्कम संबंधित मालमत्तेच्या मालमत्ता करावर बोजा म्हणून चढवून वसूल केली जाईल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
शहर विद्रूप करणाऱ्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक, राजकीय वा खाजगी जाहिरातदारांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने दिला आहे.



