Pune Crime : काळेवाडीत कारचा हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणांना हॉकीस्टिकने मारहाण
Pune Crime : पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक
Pune Crime : पिंपरी: स्कुटी आडवी आल्याने कारचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणासह त्याच्या चुलत्यांना आणि मित्राला हॉकीस्टिक व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (३० सप्टेंबर) रात्री १:३० वाजेच्या सुमारास काळेवाडी फाट्याजवळ, पकवान हॉटेलशेजारी घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime :
या प्रकरणात हेमंत अनंता काळोखे (२८, रा, भुगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद नफीस रशीद कुरेशी (४०), हमजा नफीस कुरेशी (१८) आणि शहाबान अब्दुल माजिद शेख (२२, तिघे रा. काळेवाडी फाटा) यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime :
फिर्यादी हे त्यांच्या चुलत्याच्या ब्रेझा कारने जात असताना आरोपी स्कुटीवरून अचानक आडवे आले. फिर्यादीच्या चुलत्याने हॉर्न वाजवल्याने आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कारमधून येत हॉकीस्टिक, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी फिर्यादी, त्यांचे चुलते अविनाश आणि मित्र नितेश यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरीत दुचाकीच्या अपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
आरोपीने भरधाव वेगात व अविचाराने गाडी चालवल्याने झाला अपघात
पिंपरी: रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे दुचाकी चालवून झालेल्या अपघातात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पिंपरी ओव्हरब्रिजवर घडली. या प्रकरणी एका ४३ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अमोल प्रल्हाद उमाळे (३६, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अनिल पांडुरंग डांगे (५५) हे आरोपी अमोल उमाळे याच्या दुचाकीवरून पिंपरी मार्केटमधून सामान घेऊन येत होते. त्यावेळी आरोपीने भरधाव वेगात व अविचाराने गाडी चालवल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल डांगे यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.



