पुणे

पश्चिम पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

गोखलेनगर मॅपको टाकीच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्याच्या कामासाठी उपाययोजना

निलेश राऊत
पुणे: गोखलेनगर मॅपको टाकीच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार, दि. ४ जून रोजी शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारे भाग
एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.): गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पद्धतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिश्मा सोसायटीसमोरील परिसर, बिग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वे रोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्न मंदिर, सुनीता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉइंट डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर इत्यादी, करिश्मा सोसा., ते वारजे वॉर्ड ऑफिस गिरिजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधुचय, शैलेश, अलंकार, मनीषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी. चतुःश्रृंगी टाकी परिसर औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी आदी.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button