महाराष्ट्र

Sunetra Pawar यांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख, काँग्रेसवर मित्रपक्षासह सत्ताधाऱ्यांचा संताप

Sunetra Pawar सुनेत्रा पवारांबाबतच्या ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद; महायुतीकडून संताप व्यक्त

पुणे, महाराष्ट्र मिरर

Sunetra Pawar महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेचा संदर्भ देत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे सत्ताधारी महायुतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विधानाचा जाहीर निषेध करत काँग्रेसने तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. sunetra pawar gungi gudiya controversy

नेमकी घटना काय?

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून (X / ट्विटर) बीडमधील एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवताना दिसत असल्याचा दावा काँग्रेसने केला. हाच व्हिडिओ पोस्ट करताना काँग्रेसने, “सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडीया’ बनून राहतील?” असा सवाल करत निशाणा साधला होता. Sunetra Pawar

D Y Patil : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहर गटनेते निलेश निकम यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस पक्षाला शंभर वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. मात्र, अशा पक्षाकडून एका महिलेबाबत अशी भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलेचा अपमान करणारे हे वक्तव्य असून, काँग्रेसने याबद्दल विचार करावा. सुनेत्रा पवार या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असतानाही खंबीरपणे उभ्या राहून पक्षाचे नेतृत्व करत आहेत. अशा सक्षम महिला नेतृत्त्वाबाबत असा शब्दप्रयोग करणे हा महिलांचा अवमान आहे,” असे निलेश निकम यांनी स्पष्ट केले.Sunetra Pawar

PMC: पुणे महानगरपालिकेच्या पार्किंग कंत्राटदारांकडे ८६.७ लाखांची थकबाकी चव्हाट्यावर!

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. साम टीव्हीशी बोलताना मिटकरी म्हणाले की, बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याने त्यांनी बोलणे थांबवले होते; परंतु काँग्रेसने त्या व्हिडिओचा विपर्यास केला आहे.

काँग्रेस पक्षाला महिला सशक्तीकरणाची आठवण करून देताना मिटकरी पुढे म्हणाले, “ज्या पक्षाने देशात इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या महिला नेतृत्वाचा आदर केला, त्याच पक्षाकडून महाराष्ट्रातील एका महिला उपमुख्यमंत्र्याबाबत अशी हीन पातळीवरील भाषा वापरली जाणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेसने याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे.”

या वादानंतर केवळ सत्ताधारी पक्षच नव्हे, तर इतर स्तरातूनही या भाषेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसच्या टीकेचा निषेध केला आहे. “गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत,” असे म्हणत त्यांनी या विधानाचा निषेध नोंदवला आहे. Sunetra Pawar

दरम्यान, काँग्रेस पक्षाने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी महायुतीकडून करण्यात येत असून या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Rain update : खडकवासला धरणातून दुपारपासून विसर्ग वाढणार

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button