पुणेक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

Pune Crime : फुरसुंगीत विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

Pune Crime :पिंपरी: विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिच्याकडून पैशांची मागणी केली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ डिसेंबर २००९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फुरसुंगी शिवरोड येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..https://maharashtramirror.com/ Pune Crime

फिर्यादी महिलेचे लग्न झाल्यापासून आरोपी पतीने, सासूने, दिराने आणि सासऱ्याने मिळून तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. आरोपींनी फिर्यादीच्या माहेरकडून वेळोवेळी पैशांची मागणी करून ३० लाख रुपये स्वतःच्या कब्जात ठेवले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ आणि मारहाण करून तिचा छळ केला आणि तिची व तिच्या मुलीची जबाबदारी स्वीकारली नाही. फिर्यादी महिला वाकड येथे माहेरी आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.


अनधिकृत बांधकाम लपवून सदनिकेच्या खरेदी-विक्रीत १२ लाखांची अधिकफसवणूक

पिंपरी: ग्रामपंचायतीमध्ये अनाधिकृत नोंद असलेली सदनिका कायदेशीर असल्याचे भासवून आणि वस्तुस्थिती लपवून एका व्यक्तीची १२ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ९ जून २०१७ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली..https://maharashtramirror.com/ Pune Crime

याप्रकरणी निवृत्ती भाऊसाहेब ठोसर (३७, मुंबई) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बजरंग हरिभाऊ नाईकरे (४३, नाणेकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..https://maharashtramirror.com/ Pune Crime

आरोपीने आर्यन विश प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या स्कीममधील सदनिका ग्रामपंचायत अभिलेखात अनधिकृत नोंद असल्याची माहिती असतानाही ही वस्तुस्थिती लपवून ठेवली. त्याने फिर्यादी व त्यांच्या वडिलांकडून बँक खात्यामार्फत वेळोवेळी एकूण १९ लाख ५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर ९ जून २०१७ रोजी चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकेची खरेदी-विक्री फिर्यादीच्या नावावर करण्यात आली. पुढे फिर्यादीला ग्रामपंचायतीकडून सदर सदनिकेचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा आरोपीने सदनिकेची अनधिकृतता जाणीवपूर्वक लपवून ठेवून एकूण १२ लाख ७३ हजार ७४२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button