Pune News : बांधकाम व्यावसायिकाची ११.२८ कोटी रुपयांची फसवणूक

Pune News : धीरज भाटिया आणि रेश्मा भाटिया या दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे
Pune News : पुण्यामध्ये एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ११.२८ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर भागातील एका विकास प्रकल्पात भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवून धीरज भाटिया आणि रेश्मा भाटिया या दांपत्याने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pune news builder defrauded 11 28 crore fraudcase

मिळालेल्या माहितीनुसार, भाटिया दांपत्याने फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाला शिवाजीनगर येथील प्रकल्पात ४५ टक्के भागीदारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रीतसर भागीदारी करारही करण्यात आला होता. या कराराच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाने आरटीजीएसद्वारे वेळोवेळी ९.१५ कोटी रुपये आरोपींना दिले. pune news
RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम
मात्र, करारात आश्वासन देऊनही भाटिया दांपत्याने प्रकल्पाचे विकास हक्क स्वतःकडेच ठेवले. एवढेच नव्हे तर, फिर्यादीची कोणतीही संमती न घेता हे विकास हक्क तिसऱ्याच व्यक्तीला विकून ५ कोटी रुपये लाटले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने पैशांचा तगादा लावला असता, आरोपींनी २.८७ कोटी रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम परत न करता तिची विल्हेवाट लावली.
Pune Crime: आंदेकर टोळीतील गुंडांचा एसटी बॉईज टोळीकडून पाठलाग; कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तणाव

याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचे वकील अॅड. सिओल शाह यांनी सांगितले की, “पोलिसांनी योग्य तपास करून एफआयआर नोंदवली आहे. यावरून गुन्ह्याचे गांभीर्य स्पष्ट होते. योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे आता सत्य समोर येईल. तक्रारदाराचा कायद्यावर नेहमीच विश्वास राहिला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्याय नक्कीच मिळेल.” pune news
अलंकार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)



