क्राईम न्यूज

Aalandi Double Murder : आळंदी येथील दुहेरी हत्या प्रकरणी आरोपीची धरपकड

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून कारवाई

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : Aalandi Double Murder :

दिनांक ०२.०४.२०२६ रोजी सकाळी १०.०० वा च्या सुमारास हनुमानवाड़ी ठाकरवस्ती, केळगाव आळंदी येथे एक महिला व लहान मुलीचा खून झाला होता. मयत कु. धनश्री सोनु केदारी वय ०६ वर्ष व मंगल चंद्रकांत शिंदे वय ७० वर्ष असे मृत्यू झालेल्या मुली व महिलेचे नाव होते. Aalandi Double Murder

https://www.instagram.com/reel/DWq0BjTDTUQ/?igsh=dTB5YW9lY3hncjJl

गुन्हे शाखा युनिट-३ पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोउपनि गोसावी, पोउपनि जावळे, पोलीस अंमलदार सोनवणे, बोऱ्हाडे, भोसुरे,सूर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरात व वराडे असे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना तांत्रिक विश्लेषनाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील गुन्हा करणारा इसम हा आळेफाटा परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी पथक रवाना झाले व सदरच्या पथकाने आळेफाटा येथे जावुन हॉटेल समाधान जवळ, पुणे-नाशिक रोड, आळेफाटा येथुन आरोपी विनायक तुकाराम भवारी वय ३१ वर्ष धंदा सेंटरिंग रा. संगमनेर जि.अहिल्यानगर मुळ रा. तेजुर ता.जुन्नर जि. पुणे यास स्टाफचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता आरोपीने सदरची घटना कौटुंबिक कलहातुन केली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील तपास आळंदीपोलीस स्टेशन करीत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button