Anup More : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनुप मोरे यांची नियुक्ती
•भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदावर Anup More यांना संधी
मुंबई :- आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाच्या संघटनात्मक बदल केला आहे. युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर अनुप मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुप मोरे यांना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीचे नियुक्तीपत्र दिले आहे. मोरे हे मूळचे पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे आहे. यापूर्वी त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस या पदावर जबाबदारी दिली होती. त्यांनी अनेक सामाजिक व विद्यार्थी आंदोलने केले आहेत.
यापूर्वीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्याकडून भाजयुमोचे प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत मोरे यांनी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.गेली 22 वर्षे मोरे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे काम करीत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात त्यांनी वॉर्ड अध्यक्षपासून राजकीय जीवनाला सुरुवात केली.