Ambernath chain Snatching News : सोनसाखळी चोरी, महिलेच्या गळ्यातील एकाच वेळी दोन मंगळसूत्राची चोरी
Ambernath chain Snatching news : अंबरनाथ मध्ये चैन सॅचिंग प्रकार, महिलेच्या गळ्यातील तीन लाखाहून अधिक किंमतीचे मंगळसूत्र चोरीला
अंबरनाथ :- मंगलवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत चैन सॅचिंग (chain Snatching) घटना घडली आहे. या घटनेमध्ये महिलेच्या गळ्यातील तीन लाखाहून अधिक किमतीचे मंगळसूत्र मोटरसायकल वर आलेल्या दोन भामट्यांनी लंपास केले आहे. महिलेने घडलेल्या घटनेचे अंबरनाथच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला आपल्या मुलाची वाट पाहत असताना हे घटना घडली आहे. Thane Crime News
हिललाईन पोलीस ठाणे हद्दी जबरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.फिर्यादी महिला,(50 वर्ष) व्यवसाय-गृहिणी,( रा.मलंगवाडी, ता.अंबरनाथ हया व्दारली बसस्टाॅपच्या पुढे, ता.अंबरनाथ) येथे मुलाची वाट पाहत असताना, कल्याण दिशेकडुन स्पोर्टस मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले. व त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळयातील एकुण 3 लाख 30 हजार किमंतीचे दोन सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचुन घेवुन गेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द भा.द.वि.कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहे.