मुंबई

Sanjog Waghere Patil : स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांना अभिवादन करून संजोग वाघेरे पाटील यांचा उरण प्रचारदौरा सुरु !

उरण (जितीन शेट्टी):- मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील जासई येथून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेचे Mawal Lok Sabha Election उमेदवार संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil  यांचा उरण तालुका प्रचार दौरा आज सुरु झाला. स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून जासई पासून प्रचारास सुरवात करण्यात आली. या प्रचार दौऱ्यात संपूर्ण उरण तालुका पिंजून काढण्यात येणार आहे. जासई पासून धुतुम, वेश्वी, दिघोडे, चिरनेर, वशेणी, आवरे,गोवठणे, भेंडखळ, नवघर, पागोटे, सोनारी,पाणजे, बोकडविरा, नविनशेवा, करंजा, नागाव, केगाव व शेवटी उरण शहर वैष्णवी हॉटेल ते कोटनाका अशी रॅली करून उरण तालुका प्रचार दौऱ्याची सांगता होणार आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

या प्रचार दौऱ्यामधे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, शिवसेनेचे जेष्ठ नेते बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शेकापचे प्रितम म्हात्रे, कॉंग्रेसचे आर.सी.घरत, कॉ.भूषण पाटील, सर्व महिला आघाडीच्या नेत्या तसेच मोठ्या संखेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा उस्फुर्त पाठींबा पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे Maharashtra Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0