पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : मजुराला अडवून शिवीगाळ करत मारहाण

Pune News : आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : कामावर निघालेल्या मजुराला अडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (४ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊ वाजता खेड येथे कृष्णा आयकॉन सोसायटी समोरील रोडवर घडली. संतोष ज्ञानदेव वानखेडे (४९, चहोली खुर्द) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक रमेश बसनगार (४५, चहोली खुर्द) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
फिर्यादी संतोष हे कामाला जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या आरोपीने “तू मला का शिव्या देतो आहेस” असा बहाणा करून त्यांना अडवले. तिथे जमलेल्या लोकांसमोर अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचे शर्टला धरून हाताने चापटी-बुक्क्यांनी व ठोसे मारून मारहाण केली. फिर्यादीच्या पोटात आणि पाठीत पायाने लाथा मारून दुखापत केली आणि फिर्यादीचा खून करून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत..https://maharashtramirror.com/ Pune News


उघड्या दरवाजावाटे घरातून मंगळसूत्र चोरीला

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत अलंकापुरम रोड, वडमुखवाडी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी त्यांचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे एकूण नऊ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र घरातील कपाटात ठेवले होते. घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने दरवाजावाटे घरात आत प्रवेश केला. कपाटातून ते मंगळसूत्र चोरून नेले.
या प्रकरणी दिघी पोलीस तपास करत आहेत.


भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

ट्रकचालक व अन्य एकजण जखमी

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने समोर चाललेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (४ नोव्हेंबर) चाकण-शिक्रापूर रोडवर बहुल गावात घडली.
या प्रकरणी अजय रमेश रसाळ (२७, वडगाव घेणंद) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप शंकर नितनवरे (४२, वडगाव घेणंद) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. सागर सुरेश नितनवरे (२५), कमरुद्दीनशहा मुद्दीन अशी जखमींची नावे आहेत.
संदीप हा त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता. त्याने चाकण-शिक्रापूर रोडवरील बहुळगाव हद्दीत समोर चाललेल्या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप हा स्वतः गंभीर जखमी झाला. तसेच इतर वाहनातील सागर सुरेश नितनवरे आणि ट्रकचालक कमरुद्दिनशहा मुद्दीन हे देखील जखमी झाले. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. संदीप याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.


घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : घरासमोर हँडल लॉक करून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (४ नोव्हेंबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मु-हेवस्ती, कुरुळी येथे उघडकीस आली.
या प्रकरणी सुदाम मारुती मु-हे (७८, मु-हेवस्ती कुरुळी) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची तीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची लाल पट्टी असलेली डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच १४ जीडब्ल्यू ७४७०) ही त्यांच्या घरासमोर हँडल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्या गाडीचे लॉक तोडले आणि दुचाकी चोरून नेली.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत.


थेरगावात एमडी विक्री प्रकरणी दोघांना अटक

एक लाख ४५ हजार २१० रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (४ नोव्हेंबर) पहाटे सव्वाएक वाजता थेरगाव गावठाण ते थेरगाव स्मशानभूमी जाणारे रोडवर, थेरगाव येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतिक शेख यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, प्रणव सुधाकर गायकवाड (२०, रहाटणी) आणि अंश अमित चव्हाण (१९, रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
थेरगाव गावठाण येथून थेरगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०.२१ ग्रॅम वजनाचे एक लाख ४५ हजार २१० रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button