Pune News : आयुष कोमकर हत्या प्रकरणात लक्ष्मी आंदेकरांना जामीन
Pune News : मकोका कारवाईनंतर अनेक दिवसांपासून होत्या न्यायालयीन कोठडीत
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या अजित पवार गटाच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आंदेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती.https://maharashtramirror.com/ Pune News
लक्ष्मी आंदेकर या मागील काही दिवसांपासून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात होत्या. त्यांनी जामिनासाठी पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. अखेर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. विशेष म्हणजे, तुरुंगात असतानाच त्यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्यात विजय मिळवला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
काय आहे आयुष कोमकर हत्या प्रकरण?
सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्यातील १८ वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. पार्किंग परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला.
१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषची हत्या करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. आयुष हा वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा होता. वनराज यांच्या हत्या प्रकरणात आयुषच्या वडिलांचा सहभाग असल्याच्या संशयातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर, सून सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण १२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांवर आयुष कोमकर हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.



