पुणेठाणेपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

Raighad News : रायगड समुद्रकिनाऱ्यांवर पाच वर्षांत २८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

Raighad News : काशिद किनाऱ्यावर सर्वाधिक दुर्घटना; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक आणि सुरक्षा उपाययोजनांची मागणीhttps://maharashtramirror.com/ Raighad News

Raighad News :अलिबाग, महाराष्ट्र मिरर : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या पाच वर्षांत या किनाऱ्यावर बुडून २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर या दुर्घटना घडल्या असून, काशिद किनाऱ्यावर सर्वाधिक घटना नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येते. वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी किनाऱ्यांवर जीवरक्षकांची नियुक्ती आणि सुरक्षेच्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.https://maharashtramirror.com/ Raighad News

कोकणातील निळाशार समुद्र, रुपेरी वाळू आणि नारळ-पोफळीच्या बागांचे आकर्षण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक रायगडसह कोकण किनारपट्टीवरील विविध समुद्रकिनाऱ्यांना भेट देतात. या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. मात्र, समुद्रातील पाण्याचे प्रवाह, भरती-ओहोटी आणि पाण्याची खोली यांचा अंदाज नसल्याने अनेकदा पर्यटकांच्या जीवावर बेतते..https://maharashtramirror.com/ Raighad News

दिवेआगर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्साहाच्या भरात पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. समुद्रातील अंतर्गत प्रवाहांचा अंदाज नसणे, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे आणि अतिउत्साहामुळे धोकादायक ठिकाणी जाणे, ही दुर्घटनांची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील विविध किनाऱ्यांवर पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काशिद समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे.

जीवरक्षक आणि धोक्याचे फलक लावण्याची मागणी

वारंवार दुर्घटना घडणाऱ्या किनाऱ्यांवर प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करावी, समुद्रस्नानासाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित करावीत आणि त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी होत आहे. याशिवाय स्थानिक बचाव पथकांना आधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, धोकादायक भागांत सूचना फलक लावावेत आणि भरती-ओहोटीच्या काळात पर्यटकांना सतर्क करावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button