पुणेपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

Pune News : घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी जेरबंद

Pune News : विश्रामबाग पोलीस ठाण्यातील २०२४ मधील गुन्हा उघड

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून पाहिजे असलेल्या १९ वर्षीय आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक १ ने अटक केली. यश उर्फ पांड्या संतोष कुचेकर (वय १९, रा. तळजाई वसाहत, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. धनकवडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी पाहिजे, फरारी आणि तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी यश कुचेकर हा चव्हाणनगर, धनकवडी येथील विणकर सभागृहासमोर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे आणि अमित गद्रे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. सार्वजनिक रस्त्यावर विणकर सभागृहासमोर आरोपी आढळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे, दत्तात्रय पवार आणि साधना पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button