Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तसेच, त्यांना आज किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना, ही केवळ पुढील वैद्यकीय तपासणीची नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
दरम्यान, ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांची काळजी घेतली जात आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीच्या वृत्तामुळे राज्यातील राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून ते पुन्हा आपल्या नियमित कामकाजात सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



