आरोग्यठाणेपुणेमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

Mumbai News : डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai News :राज्याच्या आरोग्य सेवेत १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल; लवकरच आणखी ६२१ डॉक्टरांची भरती

Mumbai News :मुंबई : डॉक्टर होणे ही केवळ पदवी असली, तरी डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे. रुग्णांना उपचारांसोबत विश्वास, मानसिक आधार आणि आपुलकी मिळाली पाहिजे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांनी सेवाभाव, समर्पण, संवेदनशीलता आणि उत्तम रुग्णसंवादाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवनियुक्त १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा समारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या भरतीमध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश असून, पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

राज्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने एमबीबीएस डॉक्टर दाखल झाल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. लवकरच आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. डॉक्टरांना चांगले निवासस्थान, सुरक्षित परिसर आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रुग्णालयांमध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेसा औषधसाठा आणि सुसज्ज शस्त्रक्रियागृहे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रुग्ण आणि नातेवाईकांशी योग्य संवाद साधून उपचारांची माहिती स्पष्टपणे देण्याचे आवाहन केले..https://maharashtramirror.com/ Mumbai news

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये, हा शासनाचा निर्धार असल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात ६०० डॉक्टरांची भरती, १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि ३५० नवीन १०८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचा आरोग्य विभाग देशात क्रमांक एकवर नेण्यासाठी डॉक्टरांनी सेवाभावाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button