Pune News : दिवाळीनिमित्त सोमवारी स्थानिक सुट्टी; अपॉइंटमेंट आणि शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये बदल
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे यांनी सोमवारी (दि.९)स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. शुक्रवारी (दि.६) ऐवजी आता सोमवारी (िद.९)ही स्थानिक सुट्टी असेल. या सुट्टीच्या निर्णयामुळे आरटीओच्या नियमित कामकाजात, ड्रायव्हिंग लायसन्स अपॉइंटमेंट आणि ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अपॉइंटमेंट घेतलेल्या अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी ‘सारथी’ व ‘वाहन’ प्रणालीवरून ज्या अर्जदारांनी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) यासाठी सोमवारी (दि.९) पूर्वनियोजीत वेळ (अपाॅइंटमेंट) घेतली होती, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कालावधी: आयडीटीआर, आळंदी रोड व दिवे कार्यालयासाठी अपाॅइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना आता १२ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करता येतील. या अर्जदारांची ९ नोव्हेंबरचीच जुनी अपाॅइंटमेंट पूर्णपणे ग्राह्य धरली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या तारखांमध्ये फेरबदल
आरटीओच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामीण शिबीर दौऱ्यांच्या वेळापत्रकातही खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे: वेल्हा शिबीर दौरा: ३ नोव्हेंबर रोजी होणारा वेल्हा शिबीर दौरा आता २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केला जाईल. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी सर्व संबंधित नागरिकांना आणि अर्जदारांना या सुट्टीची व बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.



