Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांची खदखद ; फेसबुक वर भावनिक पोस्ट

•काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची घेतली होती भेट
पुणे :- लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसे सर्वाच पक्षातील नाराजी वृत्त बाहेर येते असताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे डॅशिंग नगरसेवक आणि आपल्या आंदोलनाने चर्चेत असलेले वसंत मोरे यांनी भावनिक पोस्ट करत आपली खदखद व्यक्त केली आहे.पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीत वसंत मोरे पोहोचल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे वसंत मोरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. Vasant More
वसंत मोरे काय म्हणाले?
मनसेचे नेते वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टमुळे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Vasant More
शर्मिला ठाकरे यांचे वक्तव्य
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या. त्या वेळी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले होते की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. त्यानंतर मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. Vasant More