Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (22 फेब्रुवारी) पुण्यात

•केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 22 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, गृह विभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीस उपस्थित राहणार,महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार
पुणे :- केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक उद्या शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केले असून प्रशासन मोठ्या प्रमाणावर केंद्रीय गृहमंत्री यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.दरम्यान अद्याप शहा यांचा पुण्यात राजकीय कार्यक्रम होणार की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही.
पश्चिम विभागीय बैठक कोरेगाव पार्क भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. पश्चिम विभागीय बैठकीचे अध्यक्ष अमित शहा हे असणार असून, त्यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदही ते भूषवतील. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल आणि निर्बंधांची सूचना दिली आहे.
अधिसूचनेनुसार, पाषाण रोड, बाणेर रोड आणि औंध रोडवर संपूर्ण दिवस जड वाहनांना बंदी असेल. शिवाय, पुणे शहरात संथ गतीने चालणाऱ्या, अति जड वाहनांवर पूर्ण दिवस बंदी लागू केली जाईल.