क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Bhayandar Robbery News : मुंबई शहरात वृद्धेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला गुजरात राज्यातून अटक

Mira Bhayandar Robbery News : भाईंदरच्या मनिभद्र नगर परिसरातील ईसा सोसायटीमधील 60 वर्षीय वयोवृद्ध महिलेला चोरट्याने 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातले लुटले आहे.

भाईंदर :- भाईंदरच्या मनिभद्र नगर परिसरातील ईसा सोसायटीमधील 60 वर्षीय वयोवृद्ध महिलेला चोरट्याने 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातले लुटले आहे.सरयणी शोजीराम कुमावत (60 वय) यांनी या संदर्भात नवघर पोलीस ठाण्यात Navghar Police Station तक्रार दाखल केली होती. Mira Bhayandar Robbery News पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींच्या विरोधात बीएनएस कलम 338(1),3(5) प्रमाणे 4 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस पथक पटलास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सलग 10 दिवस सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत आरोपी हे गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातले असल्याचे माहिती मिळाली होती. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ अहमदाबाद येथील सरदार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या आरोपींच्या परिसरात पोहोचले. सरदार नगर पोलिसांच्या मदतीने मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकाने दोन आरोपींना त्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी यांनी नवघर, कल्याण, घाटकोपर, दहिसर, कळवा, उल्हासनगर, वडाळा टी टी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. विशेषत: ही आरोपी वृद्ध महिलांना आपले शिकार बनवत होते.भानाभाई धनाजी मारवाडी (वय 45),गोपीभाई राजुभाई मारवाडी (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून सरदार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहमदाबाद शहरामध्ये राहणारे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अधिराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेद्रे, प्रशांत गांगुर्डे,दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मूल्ला, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, प्रविणराज पवार, हनुमंत सूर्यवंशी धनंजय चौधरी, समीर यादव, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, रविंद्र कांबळे, पोलीस अंमलदार नितीन राठोड, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सचिन चौधरी यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0