मुंबई

Vijay Wadettiwar : फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते

•राज्य सरकारच्या अंत्योदय रेशन कार्ड वर वर्षातून एक साडी मोफत मिळणार या योजनेवर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टिका

मुंबई :- राज्य सरकारने 2023-24 या वर्षासाठी महामंडळात प्रत्येकी साडी 355 रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना वाटण्यात आलेल्या साड्या या फाटक्या असल्याचा ट्विट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच विरोधी पक्षनेते यांनी फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते असा टोलाही सरकारला लावला आहे. Vijay Wadettiwar

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते!
तर मग देता कशाला ?
गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?

राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. Vijay Wadettiwar

२०२३-२०२४या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. Vijay Wadettiwar

इतका सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’ Vijay Wadettiwar

कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे.
म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किटन किट वाटपाच्या नाराखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले.
कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात.
जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का ? Vijay Wadettiwar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0