छत्रपती संभाजी नगरछ.संभाजी नगरपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Chatrpati sambhajinager : छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Chatrpati sambhajinager : एफडीएची कारवाई; अस्वच्छ किचन, उंदीर-किटकांचा प्रादुर्भाव

Chatrpati sambhajinager :छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर शहर आणि औद्योगिक परिसरातील आठ हॉटेल्स व आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान अस्वच्छ स्वयंपाकगृहे, उंदीर आणि किटकांचा प्रादुर्भाव, अन्नसाठवणुकीतील त्रुटी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्याच्या बाबी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) नुसार ही कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Chatrpati sambhajinager
शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक अस्थापनांच्या कॅन्टीनमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या आठ आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. अन्न तयार करणे, साठवणे आणि हाताळणे या प्रक्रियांमध्ये स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली.
बीड बायपास रोडवरील हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंटमध्ये कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र साठवणे तसेच किटकांचा प्रादुर्भाव आढळल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले. बीड बायपासवरील मुस्तफाबाद येथे मे. हॉटेल निशांत पार्क रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकघरात किटक आणि उंदीर आढळल्याचे सांगण्यात आले. उपकरणांना गंज लागलेला होता.
गंगापूर येथील मिताली हॉटेलमध्ये उपकरणांचे निर्जंतुकीकरण केले जात नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल उपलब्ध नसणे, तसेच एप्रन आणि हातमोज्यांचा वापर न करणे यांसारख्या त्रुटीही निदर्शनास आल्या. वाळूजमधील एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी कॅन्टीनचे स्वयंपाकघर अस्वच्छ आणि गर्दीचे असल्याचे आढळले. भिंतींचे पापुद्रे निघालेले होते, कोळ्यांची जाळी होती आणि अन्न साठवण्यासाठी आवश्यक तापमान नियंत्रणाचा अभाव असल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले.
शेंद्रा एमआयडीसीतील राधाकृष्ण गृह उद्योग, बालापूर येथील टेबल ९ गार्डन रेस्टॉरंट, वाळूज येथील मे. विद्या एन्टरप्राईजेस आणि मे. ग्रीन प्युअर व्हेज या आस्थापनात कीड नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभाव होता. दरवाजे आणि खिडक्यांना संरक्षक जाळ्या नसणे, अन्न साठवणुकीचे तापमान नियंत्रित नसणे आणि कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे अशा त्रुटी आढळल्या. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकत्र साठवले जात असल्याचेही नमूद करण्यात आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button