Sambhajinager News : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ १५ गावांचा रास्ता रोको
Sambhajinager News : वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर सकल मराठा समाजाचे आंदोलन; काही काळ वाहतूक विस्कळीत
Sambhajinager News : पिशोर (जि. छत्रपती संभाजीनगर): मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी चिंचोली लिंबाजी सर्कलमधील १५ गावांतील सकल मराठा समाज बांधवांनी बुधवारी (दि. ९) वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.https://maharashtramirror.com/ sambhajinager News
यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन एका लहान मुलीच्या हस्ते मंडळ अधिकारी आर. एस. कल्याणकर, ग्राम महसूल अधिकारी बी. बी. जंगले, बीट जमादार बरडे आणि निलेश बळसाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Sambhajinager news
या रास्ता रोको आंदोलनात चिंचोली लिंबाजी, वाकी, नेवपूर, घाटशेंद्रा, टाकळी अंतुर, लोहेगाव, गणेशपूर, बरकतपूर, रायगाव, वाकोद, जामडी जहागीर, दहेगाव, शेलगाव आणि दिगाव खेडी या गावांतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पिशोर पोलिसांकडून चौफुलीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.



