पुणे

Pune News : पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांच्या भावात ५ ते १५ टक्के वाढ

Pune News : पुणे : बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असली, तरी पितृपंधरवड्यामुळे मागणी वाढल्याने बहुतांश फळभाज्यांच्या भावात ५ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली.https://maharashtramirror.com/ Pune News
मार्केटयार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक होते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची, कोबी, भुईमूग शेंग, शेवगा आदी भाज्यांची आवक होते. इंदूर व आग्रा येथून बटाट्याची सुमारे ५० टेम्पो, तर इंदूरहून गाजराची १० टेम्पो आवक झाली. मध्य प्रदेशातून लसणाचीही आवक झाली.https://maharashtramirror.com/ Pune News
स्थानिक भागातून सातारी आल्याच्या सुमारे ५०० गोणी, टोमॅटोचे १० हजार क्रेट, कांद्याचे सुमारे ६० टेम्पो, तसेच भेंडी, कोबी, गवार, काकडी, फ्लॉवर, हिरवी व ढोबळी मिरची, गाजर, मटार, घेवडा, शेवगा आणि पावटा यांची आवक झाली.
दरम्यान, पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांनाही मागणी वाढली आहे. मात्र, मेथीची आवक काहीशी कमी झाल्याने तिच्या भावात वाढ झाली. इतर पालेभाज्यांची आवक स्थिर राहिल्याने त्यांच्या भावात फारसा बदल झाला नाही. रविवारी कोथिंबिरीची सुमारे १ लाख ५० हजार जुडी, तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली.
कोट
“पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांना मागणी वाढली आहे. आवक साधारण स्थिर असली तरी मागणीच्या तुलनेत काही भाज्यांची आवक कमी पडत असल्याने त्यांच्या दरात ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेषतः मेथीची आवक कमी झाल्याने तिच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत आवक आणि मागणी यावर भाज्यांचे दर अवलंबून राहतील.”
विलास भुजबळ, भाजी व्यापारी, मार्केटयार्ड

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button